महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यमंत्री जयस्वाल यांच्या निर्णयाचे कौतुक

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यमंत्री जयस्वाल यांच्या निर्णयाचे कौतुक

मुंबई दि २२ : महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026 च्या मंचावरून ग्रामविकास व पंचायत राज विभाग तथा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आशिष जयस्वाल हे केवळ आपल्या खात्या पुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास करून सातत्याने नाविन्यपूर्ण योजना पुढे आणणारे नेतृत्व आहे. राज्याच्या विकासात धोरणात्मक योगदान देताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा उल्लेख करताना मंत्री गोरे म्हणाले की, डीपीडीसी (DPDC) मधील महिलांसाठी राखीव असलेला ३% निधी पूर्वी प्रभावीपणे वापरला जात नव्हता. मात्र, या निधीचा थेट उपयोग महिलांच्या बचत गटांसाठी भांडवल स्वरूपात करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय आशिष जयस्वाल यांनी घेतला.
या निर्णयानुसार, महिला बचत गटांना थेट ₹1 लाख निधी देण्याची योजना सुरू करण्यात आली असून पहिल्याच वर्षात 1600 बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे. पुढील वर्षात हा आकडा 3000 बचत गटांपर्यंत वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

महिलांसाठी राखीव असलेला निधी थेट त्यांच्या बचत गटांच्या हातात देऊन आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग खुला करणारा हा निर्णय अत्यंत क्रांतिकारी आहे.”

या कार्यक्रमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळत असून, राज्य सरकारच्या धोरणात्मक विचारसरणीचे हे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *