इस्रायल-इराण युद्धाचा भडका आणि भारताचा जीडीपी; ‘ब्लॅक मंडे’ की सावरण्याची संधी?

 इस्रायल-इराण युद्धाचा भडका आणि भारताचा जीडीपी; ‘ब्लॅक मंडे’ की सावरण्याची संधी?

जितेश सावंत

भारतीय शेअर बाजारासाठी मागील आठवडा हा केवळ संघर्षाचाच नव्हता, तर येणाऱ्या एका मोठ्या जागतिक वादळाची नांदी देणारा ठरला आहे. गेल्या आठवड्याची सुरुवात अमेरिका-इराण तणावाने झाली, ज्याचे रूपांतर आता थेट युद्धात झाले आहे. आयटी (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण आणि जागतिक नफेखोरीमुळे गुंतवणूकदारांचे कंबरडे आधीच मोडले असताना, आज शनिवारी आलेल्या बातम्यांनी बाजाराच्या चिंतेत भर पडली आहे.

१. मध्य-पूर्वेत युद्धाची ठिणगी!

आज शनिवारी दुपारी आलेल्या ताज्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ (Operation Roaring Lion) अंतर्गत संयुक्त हवाई हल्ले सुरू केले आहेत. तेहरान, कोम आणि इस्फाहानमधील लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले असून, इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला खामेनी यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इराणने आपले हवाई क्षेत्र (Airspace) बंद केले असून इस्रायलमध्ये ‘नॅशनल इमर्जन्सी’ जाहीर करण्यात आली आहे.
बाजारावर परिणाम: या थेट लष्करी संघर्षाचा सर्वात मोठा फटका कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींना बसेल. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा $८०-$९० च्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशासाठी ही महागाई वाढवणारी धोक्याची घंटा आहे.

२. भारतीय अर्थव्यवस्था:

७.८% जीडीपी आणि नव्या मालिकेचे ‘गणित’
शुक्रवारी बाजार बंद झाल्यावर सांख्यिकी मंत्रालयाने जीडीपीची आकडेवारी जाहीर केली, जी भारतीय अर्थव्यवस्थेचे नवे चित्र स्पष्ट करते.

विकास दर:

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारताचा विकास दर ७.८% नोंदवला गेला आहे. जरी हा मागील तिमाहीतील ८.४% पेक्षा कमी असला, तरी गेल्या वर्षीच्या ७.४% पेक्षा अधिक आहे.

आधारभूत वर्ष (Base Year) बदल: सांख्यिकी मंत्रालयाने आता २०११-१२ ऐवजी २०२२-२३ हे आधारभूत वर्ष वापरण्यास सुरुवात केली आहे. या नवीन तांत्रिक बदलामुळे अर्थव्यवस्थेच्या मोजमापात आता वस्तू आणि सेवा कर (GST), ई-वाहने आणि घरगुती मदतनीसांनी प्रदान केलेल्या सेवांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे भारताची आर्थिक प्रगती अधिक आधुनिक आणि अचूकपणे मोजली जात आहे.

३. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि ‘ट्रम्प इम्पॅक्ट’

आज रात्री जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडेही असेल. ट्रम्प प्रशासनाचे आयात शुल्काबाबतचे निर्णय आणि त्याला मिळालेले न्यायालयीन आव्हान यामुळे जागतिक व्यापारात ‘अनिश्चितता’ वाढली आहे. जर हा निर्णय व्यापाराच्या विरोधात गेला, तर नॅस्डॅक (Nasdaq) आणि पर्यायाने भारतीय आयटी शेअर्सवर अधिक दबाव येऊ शकतो.

४. पुढील आठवड्यातील महत्त्वाचे ‘की-इव्हेंट्स’ (Key Events)

बाजाराची दिशा ठरवण्यासाठी खालील ३ गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल:
१ मार्च (US Payroll Data): अमेरिकेतील रोजगाराचे आकडे, जे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराची दिशा ठरवतील.

५ मार्च (IT Giants Q4 Results): TCS आणि HCL Tech चे निकाल, जे आयटी क्षेत्रातील घसरण थांबवणार का, हे स्पष्ट करेल.
५-७ मार्च (RBI MPC संकेत): रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे महागाई आणि व्याजदराबाबतचे आगामी भाष्य. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयची ‘हॉकश’ (Hawkish) भूमिका बँकिंग शेअर्ससाठी आव्हानात्मक ठरू शकते.

५. तांत्रिक विश्लेषण आणि गुंतवणूक रणनीती (Technical Strategy)

सध्याच्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांनी अत्यंत सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे:
निफ्टी लेव्हल्स: निफ्टीसाठी २५,११०-२५,००० हा अत्यंत मजबूत सपोर्ट आहे. जर युद्धाच्या बातम्यांमुळे सोमवारी हा स्तर तुटला, तर बाजार थेट २४,८००,२४७००, २४६५०,२४५०० पर्यंत खाली येऊ शकतो. वरच्या बाजूला २५२५०,२५४००,२५,६००, २५७०० हा मोठा अडथळा असेल.

रणनीती: सध्या ‘डिफेन्सिव्ह’ राहणे हिताचे आहे ,आपल्या पोर्टफोलिओमध्ये किमान २०-३०% रोख (Cash) रक्कम शिल्लक ठेवा, जेणेकरून मोठ्या पडझडीत दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळेल.
न्यायालयीन संघर्ष, जागतिक व्यापार युद्ध आणि आता थेट लष्करी कारवाई यांमुळे जागतिक बाजार एका नव्या अनिश्चित वळणावर आहे. भारताचे ७.८% जीडीपी आकडे भक्कम असले तरी, युद्धाचे सावट आणि कच्च्या तेलाचा भडका यांमुळे सोमवारी बाजारात मोठी अस्थिरता दिसू शकते. “नथिंग चेंजेस” (Nothing Changes) असा पवित्रा घेणाऱ्या जागतिक नेत्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून संयमाने व्यवहार करणे हेच या आठवड्याचे सूत्र ठेवा.

Global Conflict vs. India’s GDP – A ‘Black Monday’ or a Buying Opportunity?
The Indian stock market faces a turbulent week ahead, driven by high-stakes global developments and domestic economic shifts.
Geopolitical Crisis: The outbreak of direct conflict between Israel-USA and Iran (Operation Roaring Lion) has sent shockwaves across global markets. This military escalation is expected to push Crude Oil prices toward $80-$90, posing a significant inflation risk for India.
Domestic Resilience: India’s Q3 GDP growth stands at 7.8%, supported by a transition to the 2022-23 Base Year. The updated methodology now accurately captures growth in GST, EV sectors, and domestic services.
US Legal & Trade Impact: Global investors are closely monitoring the US Supreme Court’s ruling regarding the Trump administration’s tariff policies. Any adverse ruling could further strain the Nasdaq and Indian IT stocks.
Technical Outlook: Nifty 50 holds a crucial support zone at 25,110 – 25,000. A breach could lead to a correction towards 24,500, while 25,700 remains a major resistance.
My Strategy: With heightened volatility, a ‘Defensive’ approach is recommended. Investors are advised to maintain 20-30% cash in their portfolios to capitalize on high-quality stocks during potential market dips.
While India’s macro fundamentals are stable, the “Black Monday” sentiment looms due to global headwinds. Discipline and patience remain the keys to navigating this uncertainty.

(लेखक शेअर बाजार, अर्थविषयक घडामोडी, सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्शन कायदा तज्ज्ञ आहेत.)

ईमेल: jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *