अमेरिकेची तमा न बाळगता या आशियायी देशाकडून इराणला मदत

 अमेरिकेची तमा न बाळगता या आशियायी देशाकडून इराणला मदत

मुंबई, दि. ६ : इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या भीषण युद्धाला आता आठवडा होत आला. यामध्ये आता जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकाबाजूला श्रीमंत अमेरिका, तंत्रज्ञान कुशल इस्राईल आणि दुसऱ्या बाजूला खनिजतेलाने समृद्ध इराण यांमध्ये कोणाची बाजू घ्यावी असा पेच जगातील बहुतांश देशांसमोर आहेत. अशास्थितीत श्रीलंकेने उघडपणे इराणची बाजू घेतली आहे.

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या नौदलानं हिंदी महासागरात इराणच्या युद्धनौकेवर हल्ला केला. इराणी युद्धनौकेनं श्रीलंकेजवळ जलसमाधी घेतली. यामध्ये ८७ जणांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले. इराणची युद्धनौका डेना भारतात युद्धसरावासाठी आली होती. त्यानंतर मायदेशी परतत असताना अमेरिकेच्या पाणबुडीनं तिच्यावर हल्ला केला. श्रीलंकेचं नौदल इराणी युद्धनौकेच्या मदतीला धावलं. त्यांनी जहाजावरील अनेकांची सुटका केली. एकीकडे अनेक बलाढ्य देश अमेरिकेच्या ताकदीपुढे वाकलेले असताना श्रीलंकेच्या अध्यक्षांचं कौतुक होत आहे.

अमेरिकेच्या नौदलाच्या हल्ल्यापासून इराणी जहाजाला वाचवण्यासाठी श्रीलंकेच्या अध्यक्षांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी इराणी जहाजाला आश्रय दिला आहे. आमच्या सरकारनं दुसऱ्या इराणी जहाजाला आमच्या बंदरावर नांगर टाकण्याची आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना आमच्या देशात येण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती श्रीलंकेचे अध्यक्ष कुमार दिसानायके यांनी दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *