चहा निर्यातीत भारताचा नवा विक्रम

 चहा निर्यातीत भारताचा नवा विक्रम

मुंबई, दि. ९ : करोडो भारतीयांचे सर्वांधिक पसंतीचे पेय म्हणजे चहा. आपल्या देशात तयार होणाऱ्या चहाचे सर्वाधिक ग्राहक भारतीयच आहोत. मात्र आता भारताने चहा निर्यांतीत एक मोठा विक्रम केला आहे. भारताची चहा निर्यात २०२५ मध्ये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. ही वाढ प्रामुख्याने इराण आणि इराकमधून होणारी मोठी खरेदी आणि चीनकडून वाढती मागणी यामुळे झाली. भारतीय चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार, भारताने २०२५ मध्ये (जानेवारी-डिसेंबर) २८,०४,००,००० किलो चहा निर्यात केला. गेल्या वर्षी २०२४ मध्ये याच कालावधीतील २५६,१७०,००० किलोपेक्षा हे जास्त आहे.

२०२५ मध्ये निर्यात उत्पन्न ८,४८८.४३ कोटी रुपये झाले, जे २०२४ मध्ये ७,१६७.४१ कोटी रुपये होते. देशनिहाय उद्योग आकडेवारीनुसार, यूएई, इराक आणि चीनमध्ये चहाचा वापर झपाट्याने वाढला, तर रशिया आणि अमेरिकेत घट दिसून आली. चहा मंडळाचे उपाध्यक्ष सी. मुरुगन यांनी सांगितले की, भारताने नोंदवलेली चहा निर्यातीची ही सर्वोच्च पातळी आहे आणि यासाठी निर्यातदार कौतुकास पात्र आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *