केंद्राकडून इथेनॉलच्या दरात वाढ

 केंद्राकडून इथेनॉलच्या दरात वाढ

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारनं 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीनं सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत. दरम्यान, येणाऱ्या नवीन 2024 या वर्षात 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (petrol) मिळणार मिळणार आहे. 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण सध्या 11.77 टक्के इथेनॉल मिसळले जाते. दरम्यान, तांदूळ आणि मक्यापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात (Ethanol Price) देखील केंद्र सरकारने प्रतिलिटर तीन रुपये 71 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सराकरनं दिलेल्या माहितीनुसार खराब तांदळापासून तयार होणारे इथेनॉल 64 रुपये लिटर आणि मक्यापासून तयार होणारे पेट्रोल 66 रुपयाने मिळणार आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा केंद्र सरकारनं इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं 7 ऑगस्ट रोजीच तांदळापासूनच्या इथेनॉलला 4 रुपये 75 पैसे, तर मक्यापासूनच्या इथेनॉलला 6 रुपये 1 पैसा प्रोत्साहन म्हणून जादा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पंधरा दिवसांतच पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणाचा वेग कायम ठेवण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार आता मक्याला प्रोत्साहन देत आहे. मक्यापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या किमतीत वाढ केल्यास नफा वाढण्यास हातभार लागणार आहे.

ML/KA/SL

31 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *