छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्या हस्ते अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण
मुंबई, दि १९
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ अंतर्गत, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमानंतर दादर येथील क्रीडा भवन येथे महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे आणि शिवगीतांचे सादरीकरण करण्यात आले.
माननीय राज्यपाल यांच्याकडून कौतुक
संगीत कला अकादमीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शिवगीतांना माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांनी मनमुराद दाद देत कलाकारांचे कौतुक केले. तसेच ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, खासदार श्री. अनिल देसाई, आमदार श्री. सुनील शिंदे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, नगरसेविका श्रीमती तृष्णा विश्वासराव, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष) (अतिरिक्त कार्यभार) श्री. विनायक विसपुते आणि महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १९ फेब्रुवारी २०२६) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयदीप मोरे आणि महानगरपालिका उप सचिव श्री. सुशील महाजन यावेळी उपस्थित होते.
भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयदीप मोरे आणि ईतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.KK/ML/MS