भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन, राज्य हळहळले, उद्या अंत्यसंस्कार
पुणे, दि. २८ : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात होऊन त्यात त्याचे निध झाले आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह 4 सणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज (बुधवारी) बारामती दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार महत्त्वाच्या सभा नियोजित होत्या. याचसाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र, विमानतळावर लँडिंग करत असतानाच हा विमानाचा अपघात झाला. यावेळी विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि इतर सहकारी होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता बारामती विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. अंत्यविधीसाठी
पंतप्रधान मोदी, अमित शाह अंत्यविधीसाठी राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र शासनाकडून तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला आहे.
अजित पवार आज सकाळी मुंबईहून एका खाजगी विमानाने (Lear Jet 45) बारामतीकडे रवाना झाले होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बारामतीत चार जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी साधारण ८:४५ च्या सुमारास विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. प्राथमिक अहवालानुसार लँडिंगच्या वेळी विमानाला तांत्रिक अडचण आली, ज्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीच्या बाजूला जाऊन आदळले आणि त्यानंतर विमानाने भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
अपघातग्रस्त विमानातील मृत प्रवासी
- माननीय अजित दादा पवार साहेब
- मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
- पायलट कॅप्टन सुमित कपूर
- कॅप्टन संभवी पाठक
- पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
SL/ML/SL