कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
मुंबई दि. २८ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत कापूस खरेदीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. या निर्णयासोबतच हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया 1 मार्च 2026 पासून सुरू होणार असल्याचेही रावल यांनी सांगितले.
राज्यात कापूस खरेदीची मुदत वाढवावी, अशी मागणी सातत्याने शेतकरी संघटनांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर पणन विभागाने कापूस खरेदीची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. या मागणीचा सकारात्मक विचार करत केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उशिरा कापूस बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता हमीभावाचा लाभ मिळणार आहे असे मंत्री म्हणाले. या निर्णयासोबतच हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया 1 मार्च 2026 पासून सुरू होणार असल्याचेही रावल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य शासनाकडून शेतकरी नोंदणी करून किमान आधारभूत किंमत 5 हजार 875 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदी केला जाणार आहे.या निर्णयामुळे कापूस आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
ML/ML/SL