जातीवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्या चा कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दीतसभेत निर्धार!
मुंबई, दि १८
ब्रिटिश सत्ताकाळात असेल किंवा त्या नंतरच्या सत्ता काळात,किती तरी दडपशाही अवलंबिली गेली तरी कम्युनिस्ट पक्ष कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलेला नाही आणि श्रमिकांच्या प्रश्नापासून कधीही दूर गेलेला नाही, म्हणूनच आज हा पक्ष कामगार वर्गामध्ये ताठ मानेने उभा आहे,असे परखड विचार मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू,केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य,माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी येथे कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी महोत्सवाच्या औचित्याने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यवक्ते म्हणून बोलतांना मांडले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीवर्षानिमित्त भायखळा, कामाठी पुरा,ताडदेव शाखेच्या वतीने,ना.म.जोशी मार्गावर नुकतिच जाहीर सभा पार पडली,सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मुंबई कौन्सिलचे सचिव कॉ.मिलिंद रानडे होते.
भालचंद्र मुणगेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले,शंभर वर्षांत कम्युनिस्ट पक्षाने पददलित,श्रमिकांवर असलेली आपली निष्ठा, कधीही ढळू दिली नाही,तत्वांशी तडजोड केली नाही,म्हणूनच हा पक्ष इतरांहून वेगळा राहिला आहे.
या सभेला खास उपस्थित असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ.शैलेंद्र कांबळे,कॉ.उदय भट,उबाठाचे,गिरणी कामगार नेते सत्यवान उभे, बाळ खवणेकर,ऍड.बबन मोरे , रिपब्लिकन पक्ष आणि गुलाबराव जगताप,माथाडी कामगारनेते यांनी कॉ.अमृत श्रीपाद डांगे यांच्या लढ्याच्या आठवणी जागवून कम्युनिस्ट पक्षाला शुभेच्छा दिल्या.भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कौन्सिलचे सचिव सुभाष लांडे कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास विषद करून म्हणाले, आता जातीयवादी सरकार विरुद्ध, समविचारी पक्षांनी लढणे गरजेचे आहे. फडणवीस सरकार जाती-जातीमध्ये आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून राजकारण करीत आहे.या विषारी राजकारणाविरुद्ध लढण्यासाठी तयार राहण्याचे त्यांनी सर्वांना आवाहन केले
अध्यक्षस्थानावरून बोलताना कॉ. मिलिंद रानडे म्हणाले, कम्युनिस्ट पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी गेली शंभर वर्षे तत्वनिष्ठ असा राजकीय व्यवहार केला आहे.आज जातियवादी शक्ती सत्तेवर असल्यामुळे यापुढेही तत्वनिष्ठेने लढण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी आपल्या भाषणात जोर दिला.बीजेपी सारखे जातीयवादी सरकार सत्तेवरून खाली खेचेपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत,असाही निर्धार कॉ. मिलिंद रानडे यांनी आपल्या भाषणात शेवटी व्यक्त केला.
आयटकचे काँ. सुकुमार दामले, इंटकचे बजरंग चव्हाण,संयुक्त मराठी मुंबई चळवळचे नेते रमाकांत बने आदी विविध पक्षाच्या कामगार नेत्यांनी उपस्थित राहून, कम्युनिस्ट पक्षाला शुभेच्छा दिल्या.
या निमित्ताने क्रांतिसिंह नाना पाटील, कॉ.बाबूराव जगताप, कॉ.सरस्वती जगताप, लोकशाहीर कॉ.अमर शेख, कॉ.गुलाबराव गणाचार्य,कॉ.जी.एलरेड्डी,कॉ तारा रेड्डी या नामवंताना मरत्तोत्तर जीवन गौरव देऊन त्यांचे कार्य संस्मरणीय करण्यात आले तर आजही लाल झेंड्याखाली शौर्याने लढणारे कॉ.क्रांती जेजूरकर आणि कॉ.प्रकाश रेड्डी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सभेच्या सुरुवातीला कॉ.क्रांती जेजुरकर यांनी प्रास्ताविक केले. कॉ.प्रकाश रेड्डी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.सूत्रसंचालन कॉ.नंदकुमार मळईकर यांनी केले.उपस्थिता़चे आभार ऍड.अरुण निंबाळकर यांनी मानले. सभेला मोठी गर्दी होती.••ऍड.अरुण निंबाळकर,सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. KK/ML/MS