मालवाहतुकीचे सर्व चेकपोस्ट रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

 मालवाहतुकीचे सर्व चेकपोस्ट रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई दि १३ : राज्यातील विविध जिल्ह्यात मालवाहतुकीच्या तपासणीसाठी उभारण्यात आलेली सर्व चेकपोस्ट रद्द करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे मात्र त्यापोटी द्यायच्या नुकसानभरपाई ची रक्कम देण्यासाठी वित्त विभागात प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. संबंधित लक्षवेधी सूचना नाना पटोले यांनी उपस्थित केली होती .

संबंधित सर्व चेकपोस्ट ठेकेदाराला २००८ साली पंचवीस वर्षांसाठी कराराने देण्यात आले आहेत, केंद्र सरकारने हे सर्व चेकपोस्ट रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत तोच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र ठेकेदाराने सात हजार पाचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मिळण्याची मागणी केली आहे, ही रक्कम जास्त आहे म्हणून वित्त विभागाकडून त्याबाबत मत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असं ही मंत्र्यांनी सांगितलं.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *