बार्टीच्या निबंधक पदाचा डॉ. सुचिता शिंदे यांनी स्वीकारला पदभार

 बार्टीच्या निबंधक पदाचा डॉ. सुचिता शिंदे यांनी स्वीकारला पदभार

पुणे, दि ६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्थेच्या निबंधक पदाचा पदभार छत्रपती संभाजीनगर भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता वसंतराव शिंदे यांनी गुरुवार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी स्वीकारला.
बार्टी, पुणे मुख्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द (बुध्दरूप) यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्था राज्यातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी बार्टी संस्थेच्या निबंधकपदी प्रतिनियुक्तीने डॉ. सुचिता वसंतराव शिंदे यांची नियुक्ती केली होती.
कार्यालय अधीक्षक श्रीमती प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. सारीका थोरात, शुभांगी सुतार यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांना पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, जिल्हा जात पडताळणी समितीचे विभागप्रमुख रविंद्र कदम, लेखाधिकारी नितिन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी उल्हास शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, नितीन सहारे, महेश गवई यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. सुचिता शिंदे यांची बार्टी संस्थेत निबंधक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *