mmcnews mmcnews

आरोग्य

14 वर्षे वयोगटातील मुलींना ही कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत

मुंबई, दि. २५ : भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे एक मोठे संकट आहे. या विरोधात केंद्र सरकारने आता देशव्यापी ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतंर्गत देशातील 14 वर्षे वयोगटातील मुलींना लक्ष्य करण्यात येणार असून, त्यांना ही प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे मोफत दिली जाईल.लसीकरण सत्रे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या […]Read More

कोकण

कोकण रेल्वेच्या या गाड्यांमध्ये नवीन AC इकॉनॉमी डबे

मुंबई, दि. २५ : हिवाळा सरुन उन्हाळ्याच्या झळा सुरु झाल्यावर आता कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी आल्हाददायक माहिती दिली आहे. कोकणकन्या आणि मांडवी या लोकप्रिय गाड्यांमध्ये अतिरिक्त एसी इकॉनॉमी डबा जोडल्याने प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मध्य रेल्वेने दोन्ही गाड्यांमध्ये 3-टियर एसी इकॉनॉमीचा 1 कायमस्वरूपी अतिरिक्त डबा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. CSMT-मडगाव 20111 […]Read More

शिक्षण

NCERT च्या या पुस्तकाच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली. दि. २५ : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आक्षेप घेतल्यानंतर ‘न्यायिक भ्रष्टाचार’ (ज्यूडीशियल करप्शन) या प्रकरणाच्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली होती. सरन्यायाधीशांनी म्हटले की, जगात कोणालाही न्यायपालिकेची बदनामी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय वाटतो. मी स्वतः हे प्रकरण […]Read More

ट्रेण्डिंग

९९ लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अर्थसहाय्य बँकेत जमा

मुंबई, दि. २५ : अतिविलंबाने का होईन पण राज्य सरकारकडून काहीसे दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ९९ लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १५ हजार ६६१ कोटी रुपयांची मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा करण्यात आली आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद […]Read More

पर्यटन

एलिफंटा लेण्यांची स्वयंचलित डिजिटल ऑडिओ टूर

युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या घारापुरी (एलिफंटा) लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) एक अभिनव भेट दिली आहे.या ऐतिहासिक लेण्यांची माहिती आणि त्यांचे प्राचीन महत्त्व अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आता ‘स्वयंचलित डिजिटल ऑडिओ टूर’ (Self-guided Digital Audio Tour) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाने सुरू केलेला […]Read More

ट्रेण्डिंग

जगप्रसिद्ध पॉप स्टार शकीरा पुन्हा भारत दौऱ्यावर

मुंबई, दि. 24 : आपल्या ठराविक शैलीतील डान्स आणि आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी जगप्रसिद्ध पॉप स्टार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका शकिरा पुन्हा एकदा भारतात येत आहे. शकिरा एप्रिल महिन्यात मुंबई आणि दिल्लीत भव्य कॉन्सर्ट करणार आहे. ‘फीडिंग इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आणि झोमॅटोच्या ‘डिस्ट्रिक्ट’ प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

प्रहार – नवीन राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जाहीर

नवी दिल्ली, दि. २४ : देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. गृह मंत्रालयाने देशाचे नवीन राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण आणि रणनीती जाहीर केली असून, याला ‘प्रहार’ (PRAHAAR) असे नाव देण्यात आले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये दहशतवादाचे स्वरूपही बदलत असून, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे व्यापक धोरण तयार करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

केरळ राज्याचे नाव आता बदलणार

थिरुवनंतपुरम, दि. २४ : केरळ राज्याचे नाव आता लवकरच बदलणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून केरळ राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने, आज ‘केरळ’ या राज्याच्या नावात बदल करून ते ‘केरलम ’ असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती ‘केरळ (आल्टेरेशन ऑफ नेम ) बिल , 2026’ हे विधेयक […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी बंधनकारक

गांधीनगर, दि. २३ : गुजरात सरकारने विवाह नोंदणीसंदर्भात महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. या नव्या नियमांनुसार प्रेमविवाहासाठी आई-वडिलांना अनिवार्यपणे माहिती देणे बंधनकारक ठरणार आहे. म्हणजेच, आता गुपचूप किंवा घरच्यांना न सांगता लग्न करणे कठीण होणार आहे. विवाह नोंदणीपूर्वी पालकांना नोटीस पाठवली जाईल आणि त्यांची संमती घेणे आवश्यक ठरेल. या निर्णयामागे सरकारचे म्हणणे आहे की अशा […]Read More

मनोरंजन

धर्मेंद्रचा अखेरचा चित्रपट OTT वर

मुंबई, दि. 23 : दिवंगत अभिनेते धर्मेद्र यांचा अखेरचा चित्रपट इक्कीस 26 फेब्रुवारीला Prime Video वर दाखल होत आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा युद्धपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1971 च्या बसंतरच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर कथा उलगडते. चित्रपटात युद्धदृश्यांबरोबरच वडील ब्रिगेडियर मदन लाल खेतरपाल आणि पाकिस्तानातील ब्रिगेडियर जान मोहम्मद निसार यांच्यातील भावनिक […]Read More