AI च्या वापराविरोधात ऑस्ट्रेलियाची सरकारी माध्यम संस्था संपावर
मेलबर्न, दि. २५ : ऑस्ट्रेलियातील सरकारी माध्यम संस्था ABC मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराविरोधात आणि वेतनवाढीच्या मागणीसाठी पत्रकार व कर्मचाऱ्यांनी आज 24 तासांचा ऐतिहासिक संप केला. पत्रकारांचे म्हणणे आहे की व्यवस्थापन AI तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी नोकऱ्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
एबीसीमध्ये ४,४०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यापैकी सुमारे २,००० लोक वृत्त विभागात काम करतात. कर्मचाऱ्यांना तीन वर्षांत एकूण १० टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. यात पहिल्या वर्षी ३.५ टक्के आणि पुढील दोन वर्षांत प्रत्येकी ३.२५ टक्के वाढ समाविष्ट होती. AI माहिती देऊ शकते, पण सत्य पडताळणी, सामाजिक संदर्भ आणि मानवी संवेदनशीलता फक्त पत्रकारच देऊ शकतात. AI चा वापर मर्यादित ठेवावा आणि मानवी पत्रकारांच्या नोकऱ्या संरक्षित कराव्यात.” असे पत्रकार संघटनांचे म्हणणे आहे. AI चा वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी होत असल्याचे सांगितले, पण नोकऱ्या कमी करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान युरोप व अमेरिकेतही पत्रकार संघटना AI च्या वाढत्या वापराविरोधात आवाज उठवत आहेत. AI तंत्रज्ञानामुळे बातम्या तयार करणे, संपादन करणे आणि प्रसारित करणे वेगाने होत आहे, पण मानवी पत्रकारांच्या नोकऱ्यांवर धोका निर्माण झाला आहे. भारतातील माध्यम संस्थांनीही AI चा वापर सुरू केला आहे, त्यामुळे पत्रकारांना कौशल्यवृद्धी व तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. ABC मध्ये झालेला हा संप AI विरोधातील जागतिक पत्रकार आंदोलनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
दरम्यान जगभरातील वस्तूस्थिती अशी आहे की, AI चा वापर थांबवणे शक्य नाही, पण त्यासोबत काम करणे शिकणे गरजेचे आहे.पत्रकारांनी डेटा पडताळणी, विश्लेषण, सामाजिक संदर्भ देणे यावर भर दिला पाहिजे. तांत्रिक कौशल्ये (AI टूल्स वापरणे, डिजिटल पत्रकारिता) आत्मसात करणे आवश्यक आहे. अद्ययावत राहण्यासाठी पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन AI वापरावर मर्यादा व नियम घालण्याची मागणी करावी. माहिती व प्रसारण मंत्रालयाशी चर्चा करून पत्रकारांच्या नोकरी सुरक्षिततेसाठी कायदेशीर चौकट तयार करावी. वाचकांना/प्रेक्षकांना मानवी पत्रकारांचे महत्त्व पटवून द्यावे.
SL/ML/SL