केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्यसभा खासदार पदाची हॅट्रीक

 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्यसभा खासदार पदाची हॅट्रीक

मुंबई, दि ५- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज राज्यसभेचा फॉर्म भरला असून महाराष्ट्रातुन राज्यसभेतुन निवडुन जाणा-या 7 खासदारांची बिनविरोध निवड होणार आहे. त्यात रामदास आठवले यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांची भाजपच्या सहकार्यातुन सलग तिस-यांदा राज्यसभेवर निवड होत आहे. यंदा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ना. रामदास आठवले यांची राज्यसभेच्या खासदार पदाची हॅट्रीक साधणार आहेत. ना. रामदास आठवले यांनी आज राज्यसभेचा उमेदवारीचा अर्ज विधान भवनात दाखल केल्यानंतर चैत्यभुमी येथे येवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सिमाताई आठवले, पुत्र जीत आठवले, रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर, राजा सरवदे, सिध्दार्थ कासारे, एम.एस. नंदा, पप्पु कागदे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात जुलै 2016 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्ये दुस-यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2024 मध्ये तिस-यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे केंद्रीय न्याय राज्यमंत्री पदाची सलग तिस-यांदा शपथ घेवून रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची हॅट्रीक केलेली आहे. यापूर्वी सन 2014 मध्ये ना. रामदास आठवले यांची भाजपच्या सहकार्यातुन राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर 2020 मध्ये ना. रामदास आठवले यांची राज्यसभेवर निवड झाली. यंदा 2026 रोजी सुध्दा भाजपच्या सहकार्यातुन राज्यसभेवर निवड होत आहे. या निवडीचे वैशिष्टय असे रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चा घटक पक्ष आहे. भाजपच्या कोटयातुन ना. रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यांनी 2014 मध्ये 2020 व 2026 मध्ये यंदा सुध्दा ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या आपल्या पक्षाच्या एबी फॉर्मवरच राज्यसभेचा अर्ज दाखल केलेला आहे. यापूर्वी 2 वेळा राज्यसभेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या एबी फॉर्मवरच ना. रामदास आठवले यांची निवड झालेली आहे. ना. रामदास आठवले यांची भाजप आणि महायुतीच्या आमदाराच्या मतदानाच्या बळावरच राज्यसभेवर निवड झालेली आहे.

ना. रामदास आठवले हे तीनही वेळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या एबी फॉर्मवर राज्यसभेत महाराष्ट्रातुन निवडुन गेलेले आहेत. राज्यसभेत ते भाषण करण्यासाठी उभे राहतात तेव्हा त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे सदस्य म्हणुन उल्लेख केला जातो. यापूर्वी सुध्दा ना. रामदास आठवले यांनी भिवंडीची लोकसभा निवडणुक लढविली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या एबी फॉर्मवरच निवडणुक लढविली आहे. यापूर्वी 1996 मध्ये त्यांनी पहिली लोकसभा निवडणुक ईशान्य मुंबईतुन लढवली रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी ईशान्य मुंबईतुन लोकसभा निवडणुक लढवली. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्या निवडणुकीत भाजपचे प्रमोद महाजन हे निवडुन आले. सांगोले, रामदास आठवले आणि प्रमोद महाजन अशी तिहेरी लढत ईशान्य मुंबईतुन झाली होती. त्या निवडणुकीत ना. रामदास आठवले यांनी अडीच लाखा पेक्षा जास्त मतदान घेतले होते. तर 1998 मध्ये दक्षिण मध्य मुंबईतुन ना. रामदास आठवले कॉग्रेस आणि रिपाइं युतीतुन निवडणुकीला उभे राहिले आणि पत्रकार नारायण आठवले यांचा पराभव करुन ना. रामदास आठवले लोकसभेवर निवडुन गेले. ती निवडणुक सुध्दा ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या एबी फॉर्मवरच लढवली होती. पंढरपूर मतदार संघातुन ना. रामदास आठवले 1999 आणि 2004 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकीत पंढरपुर मधुन निवडुन आले. 1999 मध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या एबी फॉर्मवर खटारा चिन्ह घेवुन निवडणुक लढवली. तेव्हा ते निवडुन आले. 2004 मध्ये जवान हे निवडणुक चिन्ह घेवून ना. रामदास आठवले पंढरपुर लोकसभा मतदार संघातुन रिपब्लिकन पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडणुन आले. 2009 मध्ये ते लोकसभा निवडणुक शिर्डी मतदार संघात लढले . त्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये शिवशक्ती -भिमशक्तीचा नवा प्रयोग केला . व त्यांनी सत्तेची भाकर फिरवली आणि त्यानंतर 2012 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवशक्ती – भिमशक्ती प्रयोग यशस्वी झाला आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपा रिपाइंची सत्ता आली.

2014 मध्ये रिपब्लिकन पक्षाने भाजपला सोबत घेवून भाजप सोबत युती करुन भाजपची सत्ता देशात आली. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एक वादळ देशात उभे राहिले. 2014 मध्ये ना. रामदास आठवले यांना राज्यसभेवर भाजपच्या सहकार्यातुन निवडुन देण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मुळ सांगली जिल्हयातील कवठेमंगळ तालुक्यातील आहेत. कवठेमंगळ तालुक्यातील धानेवाडी गावातुन मुंबईत आले. वडाळा येथील होस्टेलमध्ये ते राहिले. दलित पँथर या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे दलित पँथर बरखास्त झाल्यानंतर भारतीय दलित पँथर म्हणून या आंबेडकरी चळवळीतल्या प्रमुख संघटनेचे नेतृत्व त्यांनी केलं. 1978 ते 1990 पर्यंत भारतीय दलित पँथरच्या सर्व नेतृत्वाची सुत्र ना. रामदास आठवले यांच्याकडे होती. भारतीय दलित पँथरचे सर्वेसर्वा म्हणून ना. रामदास आठवले देशात लोकप्रिय होते. भारतीय दलित पँथरच्या माध्यमातुन ना. रामदास आठवले यांनी दलित, शोषीत, आदिवासी तमाम आंबेडकरी जनतेच्या न्याय हक्काचा लढा लढला. भुमिहिनांचा लढा लढला, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे या झालेल्या ऐतिहासीक नामांतर लढयाचे त्यांनी नेतृत्व केले. नामांतर लढयात त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या. लढले, जेलमध्ये गेले, आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

नामांतराचे आंदोलन, गायरान जमीनीचे आंदोलन, झोपडपट्टयांचे आंदोलन, दलित आदिवासी अत्याचारा विरोधातील आंदोलन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी आंदोलन, अशी अनेक आंदोलने ना. रामदास आठवले यांनी केली. आंदोलन करता करता ते विद्यार्थी दशेतच महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात निवडले गेले.

1989 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाले आणि त्या ऐक्यात त्यांनी आपले लाडके संघटन भारतीय दलित पँथर हे रिपब्लिकन पक्षात विलीन केले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस सोबत युती केल्याने कॉग्रेसचे सरकार आले. 1989 च्या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्रात कॅबीनेट समाज कल्याणमंत्री झाले. त्यांचा कार्यकाळ 1990 ते 1995 असा राहीला. 1998 ते 2009 पर्यंत सलग तीनवेळा ना. रामदास आठवले लोकसभेत राहिले. आता 2014 ते 2026 पुढे 2032 पर्यंत राज्यसभेत खासदार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपलं काम सुरु ठेवलेलं आहे. आंबेडकरी चळवळी आणि देशामध्ये कोणत्याही दलित नेत्याला एवढं भाग्य लाभलं नाही. ना. रामदास आठवले यांच्या राज्यसभेचा हॅट्रीक करण्याचा विश्व विक्रम आहे. केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही हॅट्रीक करण्याचा त्यांचा विक्रम आहे. आंबेडकरी चळवळीतुन कोणताही नेता तीनवेळा राज्यसभेतुन, लोकसभेत, तीन वेळा केंद्रीयमंत्री झालेला नाही. त्यामुळे ना. रामदास आठवले यांची ही लोकसभेची हॅट्रीक राज्यसभेची हॅट्रीक आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील राज्य मंत्रीपदाची हॅट्रीक या हॅट्रीकची देशात चर्चा सुरु आहे व केंद्रीय मंत्रिमंडळातील दलित बहुजनांचा चेहरा म्हणुन ना. रामदास आठवले हे देशात लोकप्रिय आहेत.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *