अजितदादा विमान अपघातातील कथित घातपात खणून काढू

 अजितदादा विमान अपघातातील कथित घातपात खणून काढू

मुंबई दि २५ : अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये घातपात असेल तर तो करणाऱ्याचे मुडदे देखील खणून काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केवळ राज्याची बदनामी व्हावी यासाठीच यासंदर्भातील एफ आय आर कर्नाटक सरकारने दाखल करून तो राज्याला पाठवला आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते .

अजित दादांच्या अपघात संदर्भात AAIB चा अंतरिम अहवाल प्राप्त झाला आहे, मात्र याबाबतचा पूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यातील सर्व सत्य बाहेर येईल. सध्या रोहित पवार करत असलेले यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, मात्र इतरांची देखील हीच भावना आहे हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोणताही अपघात झाल्यानंतर आधी ए डी आर ची नोंद होते त्यानंतर त्यात काही चुका अथवा घातपात आढळला तरच एफआयआर तयार केला जातो असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

या विमान अपघाता संदर्भात जो अंतरिम अहवाल प्राप्त झाला आहे त्यानुसार बारामती विमानतळावर उपलब्ध नसलेली अत्याधुनिक यंत्रणा तसंच आवश्यक दृश्यमानातेचा अभाव ही कारण दिसून आली आहेत. यासोबतच या विमानाच्या पायलटचा श्वास तपासणी अहवाल निर्दोष आल्याचंही आढळले आहे. या अपघातात मरण पावलेल्या पाचही जणांचे शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाले असून त्यांचा मृत्यू असंख्य जखमा आणि जळून झाला आहे. या सर्वांचे डीएनए अहवाल त्यांच्या नातेवाईकांची जुळले आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या विमानामध्ये कोणत्याही प्रकारचे विष अथवा स्फोटके अथवा इंधनाचे कॅन आढळले नाहीत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

भारतीय न्यायसंहितेची अंमलबजावणी आपल्या राज्याने सुरू केल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत देशात आपला दुसरा क्रमांक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. इ साक्ष प्रणालीचे प्रमाण 84 टक्के इतके वाढले आहे. आरोप पत्र वेळेत दाखल करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दोषसिद्धीचे प्रमाण बी एन एस मुळे 78% हून झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली . राज्यात ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही उभारण्यात आले आहेत त्या उभारणाऱ्या यंत्रणा स्वतंत्र असल्या तरी या सीसीटीव्हीचे एकत्रित नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी महानेत्र हे धोरण अमलात आणण्यात येत आहे. यात खाजगी सीसीटीव्ही देखील समाविष्ट करून घेण्यात येतील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *