‘सुभेदार’ची दमदार कमाई, पण दिग्दर्शक लांजेकर प्रेक्षकांवर नाराज
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतील पाचवे पुष्प असलेला ‘सुभेदार’ नरवीर तान्हाजी मालुसरे याच्या आयुष्यावरील चित्रपट काल प्रदर्शित झाला. राज्यातील जवळपास 350हून अधिक चित्रपटगृहांत या सिनेमांचे 900 पेक्षा जास्त शोज लावण्यात आले आहेत. या सिनेमाने पहिल्या पहिल्याच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर दुसरीकडे “प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट ‘सुभेदार’ !” हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय. बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल 2’, ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ या सध्या सुरू असलेल्या चित्रपटांना टक्कर देत सुभेदारने पहिल्याच दिवशी १.२ कोटी कमाई केली असल्याची माहिती मिळत आहे. असे असले तरीही दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांवर काहीसे नाराज आहेत.
दिग्पाल लांजेकर यांनी सुभेदार रिलीज झाल्यावर काही तासानंतर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओ शेअर करुन दिग्पाल लांजेकर म्हणतात, काही प्रेक्षक सुभेदार सिनेमा पाहून सिनेमाच्या क्लायमॅक्सचा काही भाग मोबाईलवर शूट करुन अपलोड करत आहेत.मी तुमच्या भावनांचा आदर करतो. पण कृपया असं करु नका. ज्यामुळे सिनेमा पाहणाऱ्या इतर प्रेक्षकांचा रसभंग होईल. त्यामुळे सिनेमाचा क्लायमॅक्स किंवा इतर कोणताही भाग शूट करु नये, अशी विनंती दिग्पाल लांजेकर यांनी केली आहे.
सुभेदार चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.
ML/KA/SL
26 Aug 2023