भारताला डावलून रशियाने पाक सोबत बनवली योजना

 भारताला डावलून रशियाने पाक सोबत बनवली योजना

मॉस्को, दि. १२ : भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या रशियाने आता पाकीस्तानाला मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाकडून भारताला मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात कच्च तेल निर्यात केलं जातं होतं. त्यामुळे भारताचा मोठा फायदा देखील झाला. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाला त्यानंतर रशियाने आपली भूमिका बदलली आहे. रशियाकडून क्रूड ऑईलचे दर वाढवण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार त्याचा मोठा फटका भारताला बसला, मात्र दुसरीकडे रशियाने युद्धाच्या काळात देखील पाकिस्तानला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली.

पाकिस्तान आणि रशियामधील जवळीक आणखी वाढली आहे. यामुळे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. रशियामधील पाकिस्तानचे रजादूत फैसल नियाज तिरमिजी यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. पाकिस्तान आता रशियाकडून अधिकाधिक तेल खरेदी करण्याची योजना बनवत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील पाकिस्तानला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा -तेव्हा रशियाने त्यांना मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तान आणि रशियामधील सैन्य सहकार्य देखील अधिक वेगाने वाढत असून, हा देखील भारतासाठी मोठा धोका मानला जात आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *