अमेरिकन बँकेच्या मिटींगमध्ये CEO च्या AI क्लोनचे भाषण

 अमेरिकन बँकेच्या मिटींगमध्ये CEO च्या AI क्लोनचे भाषण

मुंबई, दि. 29 : अमेरिकन बँकेच्या तिमाही निकालांच्या बैठकीत तब्बल 30 मिनिटे CEO चा AI क्लोन बोलत होता, मात्र उपस्थितांना हे कळवे देखील नाही. सीईओ सॅम सिद्धू यांच्या तिमाही निकालांच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये त्यांच्या AI क्लोन विश्लेषणात्मक आणि पूर्ण आत्मविश्वासपूर्ण भाषणानंतर सिद्धू यांनी स्वतःच खुलासा केला की ते बोलत नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांचा AI क्लोन बोलत होता.

CNBC च्या अहवालानुसार सिद्धू म्हणाले, “आज तुम्ही लोकांनी माझ्या वतीने जे ऐकले, ते मी नाही, माझ्या एआय क्लोनने सांगितले होते.” कस्टमर्स बँकेचे मुख्यालय पेनसिल्व्हेनियामधील फोनिक्सविले येथे आहे. या बँकेने ओपनएआयसोबत बँकिंग ऑपरेशन्स स्वयंचलित करण्यासाठी अनेक वर्षांचा करार केला आहे. सिद्धू यांच्या मते, सूचीबद्ध कंपनीच्या अर्निंग्स कॉलमध्ये असे पहिल्यांदाच घडले.

भारतातही एआय क्लोनिंग सुरू झाली आहे. बेंगळुरूची स्टार्टअप जिनैनी डॉट एआय (Genaini.ai) १२ भारतीय भाषांमध्ये आवाजाचे क्लोन तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करत आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एआय क्लोन जेवढे उपयुक्त आहेत, तेवढेच धोकादायकही आहेत. चीनमध्ये तर “घोस्ट बॉट्स” चा ट्रेंड सुरू झाला आहे, जिथे लोक दिवंगत प्रियजनांचे एआय रेप्लिका (प्रतिकृती) खरेदी करत आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *