या राज्यात होणार जगातील सर्वात मोठे Data Centre
विशाखापट्टणम्, दि. 28 : अदानी एंटरप्रायझेस आणि गूगल यांच्या संयुक्त ‘अदानीकॉनेक्स’ कंपनीच्या माध्यामातून विशाखापट्टणममध्ये हे AI डेटा सेंटर उभारले जाणार आहे. Google चे हे जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर असेल. इंटीग्रेटेड एनर्जी-कंप्यूट (energy-compute) चा जागतील हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.
यात अदानी ग्रुपने 1,41,95,65,500.00 रुपयांची महागुंतवणूक केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मंगळवारी विशाखापट्टणम येथे गूगल एआय डेटा सेंटरची पायाभरणी करण्यात आली. आनंदपुरम मंडळातील थरालुवाडा येथे हे सेंटर उभारले जाणार आहे.
हे आजपर्यंतचे भारतातील सर्वात मोठे एआय हब असणार आहे. या प्रकल्पात गूगल सुमारे 15 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणुक करणार आहे. भारतातील तंत्रज्ञान पायाभूत सुविधा क्षेत्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी (FDI) एक आहे. या डेटा सेंटरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. हे डेटा सेंटर सौर आणि पवन ऊर्जेवर चालणार आहे.