स्व-गणना पोर्टलद्वारे जनगणना 2026-27 होणार सुलभ

 स्व-गणना पोर्टलद्वारे जनगणना 2026-27 होणार सुलभ

नवी दिल्ली, दि. २८ : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 2026-27 ची जनगणना Digital प्रक्रियेद्वारे होणार आहे. ही जनगणना सुलभ करण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत. या जनगणनेमध्ये आता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून सहजपणे माहिती भरता येणार आहे. यामुळे तासनतास सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची कंटाळवाणा पद्धत आता टाळता येणार आहे. केंद्र सरकार ‘सेल्फ-एन्युमरेशन’ म्हणजेच ‘स्व-गणना’ हा नवा पर्याय घेऊन येत आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःची माहिती स्वतःच भरू शकाल.

हे पोर्टल वापरणे अगदी सोपे असणार आहे. तुम्हाला फक्त (se.census.gov.in) या पोर्टलवर जायचे आहे. कुटुंबाचा प्रमुख स्वतःच्या मोबाईल नंबरने लॉगिन करेल, ज्याची पडताळणी ओटीपी (OTP) द्वारे केली जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे पोर्टल एकूण 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. यामध्ये मॅपचा पर्याय देखील असेल, जिथे तुम्ही तुमच्या घराचे अचूक लोकेशन मार्क करू शकाल. सर्व माहिती भरून ‘फायनल सबमिट’ केल्यावर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे 11 अंकी SE ID पाठवला जाईल.

यापूर्वी जनगणना अधिकारी घरी यायचे आणि लांबलचक प्रश्न विचारायचे. आता मात्र सरकार तुम्हाला ‘सेल्फ-एन्युमरेशन पोर्टल’ची चावी देणार आहे. तुम्ही स्वतःच्या सोयीनुसार माहिती भरली की, सिस्टिम तुमच्यासाठी 11 अंकी एक खास ‘SE ID’ तयार करेल. जेव्हा अधिकारी तुमच्या घरी येतील, तेव्हा तुम्हाला फक्त हा आयडी दाखवायचा आहे. तुमची जनगणना काही सेकंदात पूर्ण होईल.

संपूर्ण देशासाठी एकच ‘नॅशनल सेल्फ-एन्युमरेशन पोर्टल’ असेल. तुमच्या राज्यात जेव्हा प्रत्यक्ष जनगणना सुरू होणार असेल, त्याच्या बरोबर 15 दिवस आधी हे पोर्टल तुमच्यासाठी खुले केले जाईल. या कालावधीत तुम्ही अगदी नीट वेळ घेऊन माहिती भरू शकता.

अधिकारी तुमच्या घरी येतील, तेव्हा ते फक्त तुमचा SE ID त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये टाकतील. तुम्ही भरलेली माहिती त्यांच्यासमोर आधीच असेल, ती फक्त एकदा ‘क्रॉस-चेक’ केली जाईल. जर काही बदल करायचा असेल, तर तो तिथेच अपडेट केला जाईल. यामुळे कागदी कामात होणाऱ्या चुका टाळल्या जातील

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *