सायली सातघरेला सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार – सुभाष हरचेकर
मुंबई, दि २४
मुंबई क्रिकेट संघटनेने नुकतेच एका रंगतदार सोहळ्यात निरनिराळ्या वयोगटातील मुले-मुली आणि पुरूष तसेच महिला संघांमधील खेळाडूनी आपल्या कामगिरीने मुंबई संघाला बीसीसीआयच्या राष्ट्रीय स्पर्धांत विजेतेपदे मिळवून दिले अशा खेळाडूना सन्मानीत केले.
लोअर परळ येथील सेंट रेजेस या पंचतारांकीत हॉटेलमध्ये विविध पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . २०२६ सालातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार सायली सातघरेला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . सायली सातघरे ही दैवज्ञ समाजातील पहिली . क्रिकेटपटू आणि खेळाडू आहे जीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. याप्रमाणेच ती पहिली दैवज्ञ महिला क्रिकेटपटूही आहे. सायलीच्या या कामगिरीचा प्रत्येक दैवज्ञ समाज बांधवाना साहजिकच अभिमान आहे. अलीकडेच सायली सातघरेने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात शानदार कामगिरी केली होती . २०२५ साली सायली सातघरेने आयर्लंड विरूद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले . आतापर्यंत सायलीने तीन कसोटी सामन्यांतून चार तर तीन एक दिवसीय सामन्यांतून तीन बळी घेतले आहेत . ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकमेव कसोटीत सायली सातघरने डावाच्या तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीची फलंदाज जॉर्जिया वोलचा एका पल्लेदार इनस्विंगरवर त्रिफळा उडवला होता . सायलीचा तो इनस्विंगर इतका प्रभावी होता की, १९८३ सालातील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलविंदर सिंग संधूने विंडीजचा सलामीचा फलंदाज गॉर्डन ग्रिनीजचा अशाच एका भेदम इनस्विंगरवर त्रिफळा उडवला होता . बीसीसीआयच्या माहिलांच्या प्रीमियर लीगमध्ये सायली सातघरे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी खेळते .
पुरस्कार सोहळा आटोपल्यावर सायली सातघरेला भेटलो आणि तीला पुरस्कार मिळाल्याबद्दल दैवज्ञ हितवर्धक समाज ,दादर संस्थेतर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण एमसीएने मला क्रीडा पत्रकार म्हणून पाठवले होते.JS/ML/MS