सावंतवाडी संस्थान चा ९८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!
मुंबई : सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांचा ९८ वा वर्धापन सोहळा नुकताच, मराठा वैभव समाजगृह, नानासाहेब सभागृह, स्टार मॉल, न चिं. केळकर मार्ग, दादर (पश्चिम ) येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. संस्था शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.
‘राजमाता जिजाऊ ‘ एकपात्री २५ वा प्रयोग – आरती मुनीश्वर यांनी सादर केला. एकपात्री भूमिकेची संकल्पना, संहिता लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा, त्यांनी स्वतः केली होती.
कोणत्याही नेपथ्या शिवाय
सादरीकरण करणारी, महाराष्ट्रातील एकमेव
स्त्री कलाकार म्हणून आरती
मुनीश्वर यांची ख्याती आहे. त्यांनी सर्व प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष – इंद्रजित सावंत, व्यवस्थापकीय विश्वस्त – सतीश सावंत, कार्याध्यक्ष – शशिकांत गावडे, विश्वस्त – दिवाकर दळवी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आला.
या सोहळ्यास सर्व पदाधिकारी,मुंबई व मुंबई बाहेरील संस्थेचे सभासद उपस्थित होते, सत्यनारायण पूजेचे यजमान लक्ष्मण सावंत यांनी सांभाळले होते.
संस्थेचे अध्यक्ष – इंद्रजित सावंत यांनी, सर्वांनी संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असून, सहकार्य करण्याचे आवाहन करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – प्रा. निता खानविलकर यांनी केले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे – मुख्य आयकर आयुक्त ( सेवा निवृत्त ) व मराठा बिझनेस फोरम चे अध्यक्ष – अरुण पवार, व उपाध्यक्ष – राजेंद्र घाग, आमदार महेश सावंत, सानेगुरुजी पुरस्कार विजेते – विजय सावंत, शिवसेना ( उबाठा )शाखा प्रमुख (बोरिवली )- विजय पवार, मराठा फेडरेशनचे अध्यक्ष – जी एस परब, सामाजिक कार्यकर्ते – जितेंद्र पवार, संस्थेच्या महिला अध्यक्षा सुचेता सावंत उपस्थित होते.JS/ML/MS