आशा भोसले यांच्या अस्थींचे गंगेमध्ये विसर्जन

 आशा भोसले यांच्या अस्थींचे गंगेमध्ये विसर्जन

मुंबई, दि. २० : स्वरस्वामीनी आशा भोसले यांच्या इच्छेनुसार आज त्यांच्या अस्थिंचे विसर्जन वाराणसी येथे गंगा नदीत विधीवत करण्यात आले. आशा भोसले यांच्या निधनाच्या आजच्या 9 व्या दिवशी आज त्यांच्या अस्थिंचे विसर्जन गंगा नदीत करण्यात आले.

आज वाराणसीमध्ये गंगा नदीच्या नमो घाटावरुन आशाताईंचे छायाचित्र असलेल्या फुलांनी सजवलेल्या बोटीतून त्यांच्या गाण्यांच्या मंद स्वरात अस्थिकलश मंत्रोच्चारात मणीकर्णिका घाटापर्यंत नेण्यात आला. या मुख्य बोटीच्या बाजूने एनडिआरएफच्या जवानांच्या मानवंदना देणाऱ्या बोटी . अशा वातावरणात मणीकर्णिका घाटापर्यंत अस्थी कलश नेण्यात आला. तिथे त्यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी विधिवत पिंडदान करुन अस्थिविसर्जन केले. यावेळी त्यांची पत्नी अनुजा व मुलगी जनाई यांच्यासह आशाताईंना अखेरपर्यंत साथ देणारे भाऊ राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड आशिष शेलार, योगेश खडिकर, स्थानिक आमदार अवध्येश सिंह यांच्यासह जीवनगाणी मित्रपरिवारातील सदस्य परिवारासोबत उपस्थितीत होते.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *