शिवडीत शिवाई फाउंडेशनच्या क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ
मुंबई, दि १९: शिवाई फाउंडेशन आयोजित व भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ भायखळ्यात उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन मनसे भायखळा प्रमुख तसेच मनसे विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस जगदीश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत क्रीडाभावना, शिस्त आणि संघभावना जपत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले. तसेच अशा स्पर्धांमुळे परिसरातील युवकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळते, असे मतही व्यक्त करण्यात आले.
या स्पर्धेमुळे भायखळा परिसरात क्रीडाप्रेमींसाठी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, युवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. युवकांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमधूनच युवकांना त्यांचे लक्ष पूर्ण करण्याचे ध्येय प्राप्त होते. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात असल्याची माहिती मनसे भायखळा सचिव महेश दादा थोरात यांनी दिली.आयोजकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.
या सोहळ्यास नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका सुप्रिया दळवी, मनसे सहकार सेना उपाध्यक्ष राजेंद्र काळे, पोपट जानकार, मयूर काळे यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.JS/ML/MS