समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या मुख्यालयाचे धारावीत उदघाटन!

 समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या मुख्यालयाचे धारावीत उदघाटन!

मुंबई, दि १५
मुबंईत समस्त कक्कय्या महासंघाचे महाअधिवेशन होणार असून समाज बांधवाना या निमित्त एकमेकांच्या विचाराची देवानघेवाण व्हावी, महाअधिवेशन यशस्वीरित्या पार पडावा यासाठी धारावीत न्यू म्युनिसिपल चाळ येथे मध्यवर्ती मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्यालयाचे उद्घाटन श्री.निवृत्ती सावळकर (अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या वतीने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी मनोज शिंदे व नवीन चाळ कमिटी यांनी कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच यासाठी परिश्रम
घेतलेल्या राम कोकणे, संदेश शिंदे,संजय शिंदे (मुंबई प्रदेश) यांचे विशेष कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. शशिकांत सोनावणे (प्रवक्ता, प्रभारी) यांनी केली.त्यांनी महासंघाच्या महा अधिवेशनाची तयारी, सर्व मंडळांचा सहभाग, तसेच अधिवेशनाचे उद्दिष्ट आणि ढोर कक्कय्या समाजासाठी होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.अध्यक्ष श्री. निवृत्ती सावळकर यांनी कार्यालयासाठी सहकार्य करणाऱ्या
सर्वांचे आभार मानले. धारावी टीम व महिला वर्गाची उत्साही उपस्थिती पाहून आनंद व्यक्त केला आणि
अधिवेशनाबाबत सविस्तर माहिती दिली.
जयंती विशेष विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान व आरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांचे उपकार कधीही विसरता येणार नाहीत, असे विचार श्री. शशिकांत सोनावणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला एम. वाय. शिंदे, नागनाथ कोकणे, चंद्रकांत कोकणे, शिवलिंग व्हटकर,लहू कोकणे, सुखदेव शिंदे,जितेंद्र सोनावणे,मनोज शिंदे
धारावीतील महासंघाचे पदाधिकारी, मुंबई टीम आदि महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.समारोप कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी संत कक्कय्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची घोषणाबाजी करत उत्साही वातावरण निर्माण केले.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *