सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू….

 सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू….

नाशिक दि ११ : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळे -शहा रस्त्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रक व पिकअप यांच्यात जोरदार धडक होऊन पिकप कार पेटली. यात दोन महिला व दोन पुरुष यांचा होरपळून मृत्यू झाला. पंचाळे येथून काहीजण पिकअप गाडीने जागरण गोंधळासाठी गेल्याची समजते रात्री परत येत असताना पंचाळे- शहा रस्त्यावर पंचाळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला. यात पंचाळे गावातील आदिवासी कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला.

पशुखाद्य भरलेल्या असलेल्या ट्रकने सुमारे १०० फूट पिकअप ओढत नेली. यात डांबरी रस्त्यावर घर्षण होऊन पिकअप पेटली असावी असा अंदाज आहे. पंचाळे व शिंदेवाडी ग्रामस्थांनी रात्री उशिरा मदत कार्य केले. सर्व चारही मृत सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील रहिवासी आहे. घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, यात जखमी झालेल्या एका वृद्धेचा अपघाताचा धक्का सहन न झाल्याने मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी व नगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे पंचाळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अशी आहेत मृतांची नावे किरण रवि मोरे (वय 23), शुभम गणेश नवले (वय 21), रिंकू शुभम नवले (वय 19), मिराबाई विश्वनाथ गांगुर्डे (वय 68)

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *