NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान
नवी दिल्ली, दि.3 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) औपचारिकपणे अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहे, ज्यामुळे तिला स्वतःच्या पदव्या प्रदान करण्याचा अधिकार मिळाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.”विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सल्ल्यानुसार शिक्षण मंत्रालयाने, एनसीईआरटीसह तिच्या सहा घटक संस्थांना एका वेगळ्या प्रवर्गांतर्गत अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित केले आहे,” असे एका अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे. या घटक संस्थांमध्ये अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथील प्रादेशिक शिक्षण संस्था, तसेच भोपाळमधील पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेचा समावेश आहे.
SL/ML/SL