गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी परळ गाव येथे रांगच रांग

 गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी परळ गाव येथे रांगच रांग

मुंबई, दि २
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅसची टंचाई काही संपायचे नाव घेत नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिला आक्रमक झाल्या असून या सिलेंडर मिळवण्यासाठी त्या तासान तास लाईनीमध्ये उभे राहत असल्याचे परळ गाव येथे पहायला मिळत आहे. या लाईनीमध्ये उभे राहून देखील त्यांना गॅस न मिळाल्याने त्यांचा नाहक मनस्ताप होत आहे. तसेच या लाईनीमध्ये तासनतास उभे राहून घुसण्याचे प्रकार घडत असून मोठ्या प्रमाणात एकमेकांचे भांडणे होत असून प्रकरण मारामारी पर्यंत जात आहे. तसेच लाईनीमध्ये उभे राहून देखील नंबर आल्यावर आपल्याला गॅस सिलेंडर न मिळाल्याने अनेक महिलांचा हिरमोड होत आहे. तर काही लोकांनी सिलेंडर बुक केला आहे परंतु सिलेंडरचा ओटीपी देखील येत नसल्याने काही महिलांचा संताप अनावर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या महिला या परिस्थितीला कंटाळलेला असून मोठ्या प्रमाणात हातबल झालेल्या पाहायला मिळत आहे.
मी गॅस सिलेंडर बुक करून 35 दिवस झाले तरी मला गॅस सिलेंडर मिळाला नाही. मी रोज या ऑफिस मध्ये येऊन माहिती घेते परंतु त्यांनी सांगितले की सिलेंडरची मागणी जास्त असून सप्लाय कमी आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही सिलेंडर उपलब्ध करून देऊ शकत नाही अशी माहिती गृहिणी शशिकला सानप यांनी दिली.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *