दस्त नोंदणी आणि शुल्क यावर नियंत्रणासाठी कायद्यात बदल…
मुंबई दि २५ : दस्त ऐवज नोंदणी आणि त्यासाठीचे शुल्क यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात आवश्यक असणारे बदल केंद्र सरकार लवकरच करीत आहे त्यामुळे त्यातील गैरव्यवहार रोखणं शक्य होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
याबाबत रत्नाकर गुट्टे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्यावर योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारला. मुंबईत जुहू येथील एका पारशी कुटुंबीयांची मिळकत परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून विक्री नोंदणी करण्यात आली त्याबाबत संबंधित सह दुय्यम सह निबंधक देवशी यांची विभागीय चौकशी करण्यात येईल असं ही मंत्र्यांनी स्पष्ट केलं. संबंधित मालमत्ता शासन जमा करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहितीही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.ML/ML/MS