नाशिक महापालिका हद्दीत जमीन घोटाळा, एस आय टी चौकशी जाहीर…
मुंबई दि २५ : नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरिबांना मिळू नये यासाठी म्हाडा , मनपा अधिकारी आणि भूमिअभिलेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे, याप्रकरणी विशेष तपास समितीमार्फत चौकशी करून महिनाभरात पुढील कारवाई करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
याबाबत ची लक्षवेधी सूचना देवयानी फरांदे यांनी उपस्थित केली होती. चार हजार चौरस मीटर भूखंडांचे तुकडे करून त्यात खोटे मोजणी नकाशे तयार करणे, बनावट सात बारा उतारे तयार करून आवास योजनेचा लाभ गरिबांना मिळणार नाही यासाठी असे घोटाळे केले, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे विभागीय आयुक्त, नाशिकचे पोलिस आयुक्त, नगररचना विभाग अधिकारी यांची संयुक्त समिती याची संपूर्ण चौकशी करून आवश्यक ती कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.ML/ML/MS