भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक

 भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक

मुंबई, दि २४
अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच, मुंबई आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विधानाने मुंबई अग्निशमन दल विभागीय अधिकारी कै. किशोर घाडीगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकदिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन मुंबई अग्निशमन केंद्र मुख्यालय, भायखळा, येथे नुकतेच करण्यात आले.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील 22 संघ सहभागी झाले होते. सर्व संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होता त्यामुळे स्पर्धा खूप रंगतदार झाली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मालेगावच्या इस्तियाक संघाने प्रतिस्पर्धी मालेगावच्याच आय एस सी संघाचा सरळ दोन सेट मध्ये १५-०७, १६-१४ असा पराभव केला. विजयी इस्तियाक मालेगाव संघातून इस्तियाक, यासीन, मुबासिर यांनी सुंदर खेळ केला; पराभूत आयएससी मालेगाव संघातून वकार याने दुसऱ्या सेट मध्ये आघाडी घेतली होती, तरीही इस्तियाक याने त्याचे आव्हान परतवून विजय संपादन केला.
उपांत्य फेरीच्या दोन सामन्यात आय एससी मालेगाव संघाने आमिर काझी यांच्या संजय भोसले प्रतिष्ठान या सोलापूर संघाचा १५-०६, १५-०६ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इस्तियाक मालेगाव संघाने सांगली जिल्हा संघाचा तीन सेट मध्ये ०६१५, १५-११, १५-०८ असा पराभव केला. या सामन्यात महेश माने व संदेश घारे यांनी अप्रतिम खेळ केला पण इष्टियाकच्या आक्रमणापुढे त्यांना हर पत्करावी लागली. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून उत्कृष्ट शूटिंग केलेल्या इस्तियाक (मालेगाव संघ) याची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील बेस्ट शूटर म्हणून संदेश घारे (सांगली) याची निवड करण्यात आली.
उपउपांत्य फेरीचे निकाल :

अमीर काझी सोलापूर विजयी विरुद्ध टेंभुर्णी संघ २१-१४

इस्तियाक मालेगाव विजयी विरुद्ध कल्याण संघ २१-१०

आयएससी मालेगाव विजयी वि. मुंबई महानगरपालिका २१-६

सांगली संघ विजयी विरुद्ध रायगड अलिबाग संघ २१-१६

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, सर्व अधिकारी, अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच चे सचिव भगत, स्पर्धा प्रमुख मंगेश भोसले, स्पर्धा निरीक्षक व माजी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप रावराणे तसे अग्निशन संघाचे राष्ट्रीय खेळाडू महेश कदम यांनी खूप परिश्रम घेतले. स्पर्धा नियंत्रक म्हणून प्रफुल्ल वाईरकर यांनी काम पाहिले., तंत्री सल्लागार म्हणून मिलिंद बिर्जे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे आयोजन मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीने पाहिले, सचिव दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी भोर एस.डी सावंत, सेवानिवृत्त विभाग अधिकारी पाटील साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे, भगत; केंद्र अधिकारी बोरुले, के किशोर घाडीगावकर कुटुंबिय, यांच्या उपस्थितीत झाले. नगरसेवक रोहिदास लोखंडे, समीर चव्हाण. मा. प्रदेश प्रतिनिधी मुंबई काँग्रेस, दत्तप्रसाद पेडणेकर, अध्यक्ष, मालवण तालुका पत्रकार संघ; गजानन आंगणे, श्री भराडी देवस्थान आंगणेवाडी, मालवण यांनीही स्पर्धेला उपस्थिती दर्शवली.

बक्षीस समारंभ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी घोष साहेब व भोर साहेब; सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे साहेब व भगत साहेब वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल चंद्रकांत विश्वासराव केंद्र अधिकारी जितेश गोरुले आणि प्रमुख अतिथी सुरज चव्हाण सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. असो. चे अध्यक्ष माजी आमदार शाम सावंत यांनी उपस्थित राहून खेळाडूना मार्गदर्शन केले.अभय या नामांकित संघाच्या सर्व माजी खेळाडूंनी स्पर्धेला उपस्थिती दर्शवली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *