मध्य पूर्वेतील अनेक देशांत CBSE बोर्डच्या १२ वीच्या परीक्षा रद्द

 मध्य पूर्वेतील अनेक देशांत CBSE बोर्डच्या १२ वीच्या परीक्षा रद्द

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रसिद्ध करण्यात आले.सात देशांतील परीक्षा रद्दCBSE च्या माहितीनुसार, बहरीन, इराण, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांतील CBSE संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी १६ मार्च ते १० एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या सर्व बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.आधी पुढे ढकललेल्या परीक्षाही रद्दमंडळाने स्पष्ट केले की, यापूर्वी १ मार्च, ३ मार्च, ५ मार्च, ७ मार्च आणि ९ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकांद्वारे ज्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या देखील आता अधिकृतपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *