WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स
मुंबई, दि. 13 : WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta कडून नवीन अॅण्टी-स्कॅम फिचर्सच्या लॉन्चिंगची घोषणा करण्यात आली आहे या नवीन अॅण्टी-स्कॅम टूल्समध्ये व्हॉट्सअॅपवर डिवाइस लिंकिंग वॉर्निंग, फेसबुकवर संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्टबद्दलचे अलर्ट आणि मेसेंजरवर प्रगत स्कॅम डिटेक्शन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
संशयास्पद वाटणाऱ्या अकाऊंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता किंवा अशा अकाऊंटकडून रिक्वेस्ट येते तेव्हा तुम्हाला याबाबत सूचना दिली जाईल.यामध्ये तुमचे ओळखीचे मित्र नसलेले किंवा प्रोफाइलवर वेगळ्या देशाचे लोकेशन दिसणारे अकाऊंट्स असू शकतात. हा अलर्ट व्यक्तींना अशा संशयास्पद रिक्वेस्ट ब्लॉक किंवा नाकारण्यापूर्वी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल. मेसेंजरवरील संभाषणामध्ये बनावट नोकरीच्या ऑफर सारख्या फसवणुकीच्या सामान्य पद्धती दिसून येतील.तेव्हा यूजर्सला नोटिफिकेशन मिळेल आणि त्यांना ते मेसेज एआय रिव्ह्यूसाठी पाठवण्याचा पर्याय दिला जाईल.
गतवर्षी मेटाने 159 दशलक्षहून अधिक फसवणूक करणाऱ्या जाहिराती हटवल्या आहेत. यापैकी 9 टक्के जाहिराती कोणीही तक्रार करण्यापूर्वी काढून टाकण्यात आल्या होत्या. 2025 मध्ये, भारतात कंपनीने फसवणूक, स्कॅम आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतींविरुद्धच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल 12.1 दशलक्षहून अधिक जाहिरातींवर बंदी घातली. यापैकी 93 टक्क्यांपेक्षा जास्त जाहिराती लगेचच हटवण्यात आल्या होत्या.