अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान गैरहजर सचिवांवर कारवाईचे अध्यक्षांचे निर्देश
मुंबई दि १३ : अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांच्या आजच्या विभागांच्या चर्चेदरम्यान कोणकोणत्या विभागांचे प्रधान सचिव अथवा अतिरिक्त मुख्य सचिव सभागृह अधिकारी गॅलरीत गैरहजर होते, त्यांच्यावर काय कारवाई केली याचा अहवाल सोमवारी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आपल्याला सदर करावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत विधानकार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.
अशा प्रकारे चर्चा सुरू असताना संबंधित सचिव त्याकडे दुर्लक्ष करतात , अधिकारी गॅलरीत गैरहजर राहतात , सभागृहाला गृहीत धरतात अशी तक्रार जयंत पाटील यांनी याआधी केली होती, त्यावर अध्यक्षांनी सर्व संबंधित सचिवांनी गॅलरीत हजर राहिलेच पाहिजे असे निर्देश दिले होते, त्याची आठवण जयंत पाटील यांनी आज पुन्हा करून दिली, त्यानंतर अध्यक्षांनी हे निर्देश दिले.ML/ML/MS