आर-मध्य आणि आर-उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी अधिकाऱ्यांसोबत साधले संवाद

 आर-मध्य आणि आर-उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी अधिकाऱ्यांसोबत साधले संवाद

मुंबई, दि ९
आर-मध्य आणि आर-उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच माननीय श्री. प्रकाश य. दरेकर ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आर-मध्य आणि आर-उत्तर विभागातील विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पहिली महत्त्वाची ‘ओळख बैठक’ घेतली. या बैठकीत केवळ परिचय न थांबवता, प्रभागातील प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या तक्रारींचा पाढा वाचत त्यांनी प्रशासनाला कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

विकासकामांचा सविस्तर आढावा
बैठकीदरम्यान आर-मध्य आणि आर-उत्तर प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि उद्यानांची कामे यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जे प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत, ते तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी दिल्या. “नागरिकांना पालिकेच्या सुविधा मिळताना कोणतीही अडचण येता कामा नये, प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशासकीय समन्वय आणि गतीवर भर
अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून मी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापसातील समन्वय वाढवून कामांना गती द्यावी. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असून, कामात दिरंगाई होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली”

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला महापालिका परिमंडळ ७ च्या उपायुक्त श्रीमती भाग्यश्री कापसे, आर/उत्तरचे सहाय्यक आयुक्त श्री. नैनेश वेंगुर्लेकर, आर/मध्यचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रफुल्ल तांबे यांच्यासह दोन्ही वॉर्डांतील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांनी प्रभागातील कामांचा सद्यस्थिती अहवाल सादर केला.

प्रकाश दरेकर यांच्या या पहिल्याच बैठकीतील आक्रमक आणि विकासभिमुख भूमिकेमुळे आर-मध्य आणि आर-उत्तर विभागातील रखडलेल्या कामांना आता मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *