मुंबई मनपाची लाडकी सफाई कर्मचारी बहीण योजना
मुंबई, दि. ६ : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाची आता विशेष दखल घेतली जाणार आहे. दरवर्षी लाडकी कर्मचारी बहीण म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेविका दीक्षा कारकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेमला मंजुरी देत सभागृहात यावर एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
स्वच्छता मोहिमेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्याची मागणी दिशा ह. कारकर यांनी करून ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून दरवर्षी सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी केली होती.