चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी महापौर श्रीमती रितू तावडे यांची घेतली सदिच्छा भेट

 चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी महापौर श्रीमती रितू तावडे यांची घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि ४
चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक ४ मार्च २०२६) सदिच्छा भेट घेतली.

महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे यांचे वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी अभिनंदन केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान भारत-चीन तसेच मुंबई आणि चीनमधील प्रमुख शहरांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा झाली. सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापार-उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान तसेच शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या संधींवर दोन्ही मान्यवरांनी सकारात्मक संवाद साधला.

श्री. किन जी यांनी मुंबई महानगरातील पायाभूत सुविधा व विकास कामांचा विशेष उल्लेख केला. या विकास कामांमुळे मुंबई महानगराचा जागतिक स्तर उंचावला आहे, असे त्यांनी नमूद केले.

महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मुंबई ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची आर्थिक व सांस्कृतिक नगरी असल्याचे नमूद करीत भविष्यातील सहकार्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला.

चीन वाणिज्य दूतावासातील अधिकारी श्री. वांग जिनशेंग हे देखील यावेळी उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *