ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर अपघातप्रकरणी कृती आराखडा
मुंबई दि २८ : घातक रसायने आणि ज्वलनशील वायू वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात झाल्यास त्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचना सर्व संबंधित उत्पादक कंपन्यांना देण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या प्रेेपोलिन गॅस टँकरच्या अपघातामुळे तब्बल ३६ तास ठप्प झालेल्या वाहतुकीबाबतचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून अमित साटम यांनी उपस्थित केला होता त्यावर जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांनी उपप्रश्न विचारले. अशा पद्धतीने होणाऱ्या अपघातांवर संबंधित कंपन्यांकडे ही यासाठी उपाययोजना नाहीत त्यामुळे अशी परिस्थिती उद्भल्यास त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून बसविणे, अशा स्थितीत महामार्गांवर असलेल्या प्रवाश्यांना घटनेबद्दल आगाऊ सूचना देणे यासाठी यंत्रणा उभी करणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत असं ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.