छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव अंदमान निकोबार येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत साजरा

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव अंदमान निकोबार येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत साजरा

पोर्टब्लेयर दिनांक 19 ~ छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जयंती महोत्सव आज अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशच्या राजधानी पोर्टब्लेयर (दीपनगर) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पोर्टब्लेयर मधील महाराष्ट्र मंडळ तर्फे येथील मराठी तरुण तरुणींनी एकता यात्रा भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅली काढली. शिवजयंती निमित्त आयोजित एकता रॅलीचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
ना.रामदास आठवले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी अंदमान निकोबार चे खासदार विष्णू पद रे आणि रिपब्लिकन पक्षाचे अंदमान निकोबार प्रदेश अध्यक्ष राहुल राम ; प्रमोद काकडे तसेच महाराष्ट्र मंडळाचे गोरखनाथ पाटील; सुनीता पाटील; दास गुप्ता;अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *