राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल कडून अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजली

 राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल कडून अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दि ११- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याबाबत एकमताने निर्धार करण्यात आला आहे. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.पुढील काळात उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या नेत्या सुनित्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला मजबूती देण्याचा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेल शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या या बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रम तसेच वंचित, दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अण्णा बनसोडे यांनी सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी, अशी सुचना दिली.
मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करत पक्ष बांधणी करण्यात येणार आहे.
बैठकीदरम्यान शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम व संघटनात्मक कामाचा आढावा सादर करत सूचना व्यक्त केल्या. सामाजिक न्याय विषयक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आगामी काळात जिल्हा व तालुकास्तरावर बैठका, जनजागृती अभियान व सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *