उबाठा सेनेच्या मदतीने चंद्रपुरात भाजपचा महापौर

 उबाठा सेनेच्या मदतीने चंद्रपुरात भाजपचा महापौर

चंद्रपूर दि १० :– शिवसेनेच्या उबाठा गटाने भाजपशी हातमिळवणी करत चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर पदासाठी निवडून आल्या आहेत. खांडेकर यांनी ३२ मते मिळवत चंद्रपूरच्या महापौरपदावर सरशी मिळवली. काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ मते मिळाली.

या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक तर MIM चा एक सदस्य तटस्थ राहिला. ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने ही चुरशीची निवडणूक भाजपने जिंकली. या महानगरपालिकेत काँग्रेसचे २६ नगरसेवक निवडून आले होते मात्र त्यांच्यात झालेल्या गटबाजीने आपसात रस्त्यावर मारामाऱ्या होण्याचे प्रकारही घडले होते. दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षालाही महापौर पद हवे होते. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती आणि त्यावर महापौर काँग्रेसचाच होण्याचा दावा केला होता.

प्रत्यक्षात उबाठा गटाने वंचित बहुजन आघाडी सोबत गट स्थापन करून महापौर पदासाठी उमेदवारीदेखील सादर केली होती. अखेर काँग्रेसच्या सोबत न जाता त्यांनी भाजप सोबत सव्वा सव्वा वर्षे महापौर पद वाटून घेण्याच्या करारावर भाजपला मतदान केले. यामुळे आता मुंबईत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *