Mumbai-Pune वाहतूक कोंडीला जबाबदार टँकर चालकावर गुन्हा दाखल

 Mumbai-Pune वाहतूक कोंडीला जबाबदार टँकर चालकावर गुन्हा दाखल

मुंबई, दि. 9 : गेल्या आठवड्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ज्वालाग्रही गॅस टँकर उलटल्यामुळे 30 हून अधिक तास वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले. अशा प्रकारची परिस्थिची पुन्हा उद्भवू नये यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी शासनाचे चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान वाहतूक कोंडीला जबाबदार असलेल्या टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणे आणि धोकादायकपणे वाहन चालवणे, इतरांचे जीवन तसेच वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे या आरोपांखाली उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील रहिवासी रतन सिंग उदय नारायण सिंग (४४) याच्याविरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्वलनशील प्रोपीलीन वायू घेऊन जाणारा हा टँकर ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आदोशी बोगद्याजवळ उलटला होता. उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर भरधाव टँकर उलटला. हा टँकर कोचीनहून गुजरातकडे जात होता.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *