विक्रोळीतील संत श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा भक्तिभावात संपन्न
मुंबई, दि ९
घाटकोपर – विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर क्र. 2 मधील हुतात्मा रवींद्र म्हात्रे मैदानावर संत श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकटदिन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. संत श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा मंडळ, विक्रोळी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी महाराजांच्या प्रतिमेची विधीवत स्थापना व पूजाविधी पार पडला. दिवसभर भाविकांनी शांततेत दर्शन घेतले. सरस्वती भजनी मंडळ
तसेच सदाशिव गायवळ यांच्या भजनांनी परिसर भक्तिरसात
न्हाऊन निघाला. सायंकाळी
“शेगावीचे श्री गजानन” या
भक्तिसंगीत कार्यक्रमात गायक उमेश सुतार व पल्लवी पाटील यांनी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
मंडळाचे अध्यक्ष औदुंबर सराफ, कार्याध्यक्ष शिरीष बामणे, सुरेश सरनोबत, गिरीश मळगावकर, शिवराम सावंत, डॉ. विनय राऊत, हेमंत रासम व विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा यशस्वीपणे पार पडला. प्रमुख सल्लागार विलास पारकर यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या संपन्न झाला.KK/ML/MS