भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार
मॉरिशस, दि. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मलेशियात दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पोहोचले, आठ वर्षांनंतर हा त्यांचा पहिलेच दौरा आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी त्यांच्या कारमधून विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी क्वालालंपूरमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले,
” पंतप्रधान अन्वर इब्राहिम स्वतः विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी आले होते. त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये येथे आणले. इतकेच नाही तर त्यांनी मला त्यांच्या सीटवर बसवले.हा विशेष सन्मान भारत आणि भारतीय समुदायाबद्दलचे त्यांचे प्रेम आणि आदर दर्शवितो. भारत लवकरच येथे स्वतःची पेमेंट सिस्टम, UPI, सुरू करणार आहे.”
दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. यावेळी दोन्ही देश भारत आणि मलेशिया यांच्यातील ‘व्यापक धोरणात्मक भागीदारी’मध्ये आतापर्यंत किती विकास झाला आहे आणि पुढे काय करता येईल, याचा आढावा घेतील.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, चर्चेत व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि लोकांमधील परस्पर संपर्क यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.
मलेशियामध्ये सुमारे २९ लाख भारतीय वंशाचे लोक राहतात, जो जगातील तिसरा सर्वात मोठा भारतीय प्रवासी समुदाय आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत आणि मलेशियाचे संबंध खूप जुने आहेत आणि ते इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेशी जोडलेले आहेत. मलेशियामध्ये राहणाऱ्या भारतीयांचा इतिहासही खूप जुना आहे आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही भूमिका बजावली होती.
परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, भारत आणि मलेशिया परस्परांतील व्यापार संतुलित करण्यासाठी आणि दीर्घकाळ पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. यासाठी भारत-मलेशिया ‘कॉम्प्रिहेंसिव्ह इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ॲग्रीमेंट’ ची समीक्षा केली जात आहे.