भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण
मुंबई प्रतिनिधी, दि. ३१ : शिवसेनेचे भायखळा येथील नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या ‘’संकल्पनेतून’’ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकार झालेल्या डॉ. बाळासाहेब आंबेडकर मार्ग, पेनिनसुला (सेल्सेट २७), भायखळा पूर्व येथील नवनिर्मित केलेल्या उद्यान आणि करमणूक केंद्राचे लोकार्पण शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. शिवसेना ही नेहमीच लोकांसाठी काम करत असते. मग सामाजिक कार्य असो की लोकोपयोगी कार्य असो. परंतु आता आम्ही नव्याने निर्माण झालेल्या उद्यानाची लवकर पण केले. येऊ दे ना तुम्ही अनेक करुणुकीचे साधने ठेवले असल्यामुळे नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करमणूक होणार असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची माहिती शिवसेनेचे स्थानिक आमदार मनोज जामसुतकर यांनी दिली. आम्ही काम करत आलो आहोत आणि यापुढे देखील लोकांसाठी काम करतच राहणार.
भायखळा विभागातील नागरिकांसाठी हे उद्यान एक सुवर्णपर्व ठरणार आहे. या उद्यानामध्ये करमणूक केंद्र तसेच जिम्नेशियमचे देखील सामान या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे त्या ठिकाणी लोकांचे आरोग्य देखील तंदुरुस्त राहणार आहे याचा मला अभिमान असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी दिली. यावेळी शाखाप्रमुख हेमंत कदम, रमेश रावल, विजय कामतेकर, राजन कोळंबकर,सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.