अखेर किन्नर आखाड्याकडून ममता कुलकर्णींची हकालपट्टी
मुंबई, दि. 27 : अखेर किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णी यांची हकालपट्टी केल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपासून त्यांच्या सदस्यत्वाबाबत वाद सुरू होता. अखाड्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, ममता कुलकर्णी यांना अखाड्याशी संबंधित सर्व अधिकार आणि जबाबदाऱ्यांमधून वगळण्यात आले आहे. 25 जानेवारी (रविवार) रोजी ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) यांनी अविमुक्तेश्वरानंद वादावर म्हटले होते की, 10 पैकी 9 महामंडलेश्वर आणि तथाकथित शंकराचार्य खोटे आहेत आणि त्यांना शून्य ज्ञान आहे.
आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी व्हिडिओ जारी करून करून म्हटले आहे की,
“आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक करून हा निर्णय घेतला आहे. आता ममता कुलकर्णी यांचा आखाड्याशी कोणताही संबंध नाही. त्या आखाड्याच्या अधिकारी किंवा सदस्य नाहीत. आमच्या आखाड्यात महिलाही आहेत, पुरुषही आहेत आणि किन्नरही आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी ज्या प्रकारे बटुक ब्राह्मणांना शेंडी पकडून मारहाण करण्यात आली, त्यामुळे आमचीही नाराजी आहे.”
अखाड्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेच्या नियमावलीनुसार वर्तन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. अखाड्याच्या परंपरा, शिस्त आणि सामाजिक जबाबदाऱ्या पाळणे हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असते. मात्र, ममता कुलकर्णी यांच्याकडून वारंवार नियमभंग झाल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अखाड्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा्या ममता कुलकर्णी 23 जानेवारी 2025 रोजी अचानक प्रयागराज महाकुंभात पोहोचल्या. दुपारी किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना भेटल्या. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर दोघेही आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र पुरी यांना भेटले. यानंतर ममता यांना महामंडलेश्वर बनवण्यात आले. त्यांचे नाव यामाई ममता नंद गिरी असे ठेवण्यात आले.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री, योग गुरु बाबा रामदेव यांच्यासह अनेक संतांनी याचा विरोध केला होता. रामदेव म्हणाले होते की, कोणीही एका दिवसात संतत्व प्राप्त करू शकत नाही. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी ममताने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद सोडले होते. मात्र, दोन दिवसांनंतर म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता.
SL/ML/SL