आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती
मुंबई, दि. २७ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनात निवेदन दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तत्काळ आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन विभागाला दिले.
विभागप्रमुख उदय पाटेकर, सिनेट सदस्य शशिकांत जोरे , नगरसेविका सारिका जोरे, नगरसेवक धरम काळे, ऍड संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे आदी यावेळी उपस्थित होते.ML/ML/MS