चीनमध्ये जन्मदरात लक्षणीयरीत्या घसरण

 चीनमध्ये जन्मदरात लक्षणीयरीत्या घसरण

बिजींग, दि. १९ :

काही वर्षांपूर्वी जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या चीन चा जन्मदर आता गंभीररित्या घसरला आहे. चीन सरकारने आज जाहीर केले की, 2025 मध्ये 79.2 लाख मुलांचा जन्म झाला, तर 2024 मध्ये ही संख्या 95.4 लाख होती. तर 2025 मध्ये मृतांची संख्या वाढून 1.13 कोटी झाली. 1949 मध्ये आधुनिक चीनच्या स्थापनेपासून आतापर्यंतची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. म्हणजेच 76 वर्षांत पहिल्यांदाच जन्मदर इतका खाली गेला आहे.

चीनमध्ये गेल्या वर्षी देशातील लग्नांच्या संख्येतही सुमारे 20% घट नोंदवली गेली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कमी विवाह झाल्याचा थेट परिणाम जन्मदरावर होतो, कारण बहुतेक तरुण लग्न आणि कुटुंब सुरू करण्यापासून परावृत्त होत आहेत.

चिनी कम्युनिस्ट पक्ष आणि सरकारने अलिकडच्या वर्षांत जन्मदर वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली. मुलांना देशभक्तीशी जोडून प्रचार करण्यात आला, लग्न आणि कुटुंबाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले, इतकेच नव्हे तर कंडोम आणि गर्भनिरोधक औषधांवरही कर लावण्यात आला. परंतु या उपायांचा तरुणांवर विशेष परिणाम झाला नाही.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *