Month: February 2025

क्रीडा

U-19 भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेता

क्वालालंपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC U-19 टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात 9 विकेट्सने धुव्वा उडवत एकूण आणि सलग दुसरा U 19 महिला विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं आव्हान दिलं […]Read More

देश विदेश

अमेरिकेतील आयातीवर कॅनडा लावणार 25% आयात शुल्क

ओटावा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांना धडकी भरली आहे. मात्र आता शेजारील कॅनडाने अमेरिकेला अडचणीत आणणारा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% शुल्क लागू करण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेजारी देशांशी संघर्ष सुरू झाला आहे. कॅनडाचे […]Read More

पर्यावरण

जागतिक पाणथळ दिन : आपल्या सामाईक भविष्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण

राधिका अघोर दरवर्षी 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो. पाणथळ म्हणजेच इंग्रजीत ज्याला wetland असे म्हणतात, त्याबद्दल तशी लोकांना फारच कमी माहिती असते. पर्यावरण आणि निसर्ग साखळीत जंगलांचं जितकं महत्त्व आहे, तितकेच महत्त्व पाणथळ प्रदेशांचे आहे. खरे तर, पाणथळ जागा, पृथ्वीवरील एकूण भूभागापैकी केवळ तीन टक्के जागेवर आहेत. मात्र, जंगले जितका कार्बन शोषून […]Read More

पर्यटन

अंदमान आणि निकोबार बेटे – भारतातील स्वर्गीय समुद्रकिनारे आणि इतिहास

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतात अनेक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळे आहेत, परंतु अंदमान आणि निकोबार बेटे ही जागा पर्यटनासाठी एक वेगळाच अनुभव देते. बंगालच्या उपसागरात वसलेली ही बेटे त्यांच्या स्वच्छ निळ्या समुद्रकिनाऱ्यांमुळे आणि ऐतिहासिक वारशामुळे प्रसिद्ध आहेत. सुंदर बीचेस, प्रवाळ भित्ती, गूढ बेटांचे जंगल आणि जलक्रीडांचे विविध पर्याय यामुळे ही बेटे पर्यटकांसाठी स्वर्गच […]Read More

Lifestyle

इटालियन रिसोटो – पारंपरिक क्रीमी तांदळाच्या पदार्थाची खास चव

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :इटालियन स्वयंपाकघर हे जगभरात प्रसिद्ध असून त्यामध्ये पास्ता, पिझ्झा आणि अनेक प्रकारचे तांदळाचे पदार्थ लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक खास डिश म्हणजे “रिसोटो” – हा एक क्रीमी आणि चविष्ट तांदळाचा पदार्थ आहे, जो खास करून इटलीच्या उत्तर भागात लोकप्रिय आहे. झटपट होणारा आणि श्रीमंत चव असलेला हा पदार्थ विविध प्रकारच्या […]Read More

अर्थ

बजेट २०२५-२६: नोकरदारांसाठी दिलासा, पण बाजारासाठी धक्का?

जितेश सावंत आज एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प हा नोकरदारांसाठी काही प्रमाणात चांगला ठरला पण शेअर बाजारासाठी काही तितकासा चांगला ठरताना दिसला नाही. बजेट मधील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे भारत ट्रेड नेट’ (BTN) ची स्थापना केली जाईल, जी व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा […]Read More

देश विदेश

अमेरिकेच्या संसदेत चिनी AI Chatbot DeepSeek च्या वापरास बंदी

वॉशिग्टन डीसी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन संसद आणि काँग्रेसने त्यांच्या कार्यालयात चीनच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) Chatbot DeepSeek च्या वापरावर बंदी घातली आहे. US काँग्रेसने यासंदर्भात एक नोटीस जारी करून म्हटले आहे की, सिस्टममध्ये धोकादायक सॉफ्टवेअर अपलोड करण्यासाठी अनेक चॅटबॉट्सचा वापर केला जात आहे. हे DeepSeek संबंधित धोके देखील स्पष्ट करते. US काँग्रेसने […]Read More

सांस्कृतिक

५ फेब्रुवारीपर्यंत गंगा आरती तात्पुरती स्थगित

वाराणसी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून करोडोंच्या संख्येने जमा झालेले भाविक कुंभस्नानानंतर आसपासच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांनी भेट देत आहेत. यामुळे गेल्या आठवड्यात अयोध्येतील प्रशासनाने पुढील काही काळ अयोध्येला येण्याच्या बेत करू नका अशी विनंती केली आहे. त्यानंतर आता वाराणसी येथे दररोज होणारी गंगा आरती देखील काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

काय आहेत अर्थसंकल्प सादरीकरणाची वैशिष्ट्ये

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्ष सुरु होताच देशातील सर्वसामान्यांसह सर्वांनाच वेध लागतात ते केंद्रीय अर्थसंकल्पाचे. सुरुवातीला अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे. मात्र मागील काही वर्षांपासून मोदी सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अर्थसंकल्प सादरी करण्यास सुरुवात केली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज करदाते, शेतकरी आणि महिलावर्गासाठी दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला.या […]Read More

अर्थ

सर्वसामान्य माणसाचे ड्रीम बजेट ! बारा लाखांचे उत्पन्न करमुक्त, महिला

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थमंत्री म्हणून सलग आठवा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सर्वांत विशेष उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे करदात्यांना सुखद धक्का देण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना एक रुपयाही टॅक्स लागू न होणार असल्याची घोषणा केली. आतापर्यंत १२ लाख रुपये वार्षिक […]Read More