Month: February 2025

ट्रेण्डिंग

न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला वाढीव मतदानाचे पुरावे सादर करण्याची नोटीस

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीनंतर विरोधी पक्षांकडून निकालाबाबत आणि निवडणूक प्रक्रियेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूण आदेश दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ६ नंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक […]Read More

देश विदेश

भारतीय अमेरिकन गायिकेला मंत्रोच्चारण श्रेणीत मिळाला ग्रॅमी पुरस्कार

कॅलिफोर्निया,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अमेरिकन गायिका व व्यावसायिक चंद्रिका टंडन यांच्या त्रिवेणी या अल्बमला यंदाचा प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्रिवेणी या अल्बममध्ये त्यांनी भारतीय मंत्रोच्चार व जागतिक संगीत याचा सुरेल मेळ साधला आहे.त्रिवेणी या अल्बमला न्यू एज, अँबियंट किंवा चँट म्हणजेच मंत्रोच्चार या श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी सहकारी […]Read More

महानगर

महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा वाढता धोका

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आल्याचा गंभीर आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी या विषयावर सरकारकडे तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली.मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, […]Read More

महानगर

७ फेब्रुवारीला घाटकोपर येथे दिव्यांग तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल्ड या सामाजिक संस्थेतर्फे दिव्यांग आणि उपेक्षित तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा ७ फेब्रुवारी रोजी घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला कला व विज्ञान महाविद्यालयात सकाळी ९:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार आहे. हा रोजगार मेळावा पूर्णतः मोफत असून, कुठलेही शुल्क आकारले […]Read More

खान्देश

धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशाचा झाला मृत्यू, आणखी एक जखमी

नंदुरबार, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीमध्ये चाकू हल्ल्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी जखमी झाला आहे. टोळक्याने नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केलेल्या हल्ल्यात दोन राजस्थानी प्रवासी जखमी झाले होते. यातील 27 वर्षांच्या सुमेरसिंग जबरसिंग याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मयत सुमेरसिंग आणि त्याच्या बहिणीचे 20 तारखेला […]Read More

राजकीय

राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विरोधी पक्षाला, राहुल गांधी आणि काँग्रेसला महाराष्ट्रातील मतदारांनी जो जोरदार फटका दिला त्यातून आजतागायत शुध्दीत आलेले नाहीत असा टोला हाणून मतदार वाढले तर चूक काय? मतदार वाढले त्यामुळे यांच्या पोटात का दुखतंय असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेच्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर नावे गायब झाली […]Read More

महानगर

दीड लाख मुंबईकरांना मुंबई पुष्पोत्सवा’ची भुरळ !

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविधरंगी फुलांनी सजविलेली राष्ट्रीय प्रतिके, बोधचिन्ह तसेच फळे व फुलं भाज्यांची रेलचेल यासह बगीच्यासाठी लागणारी खते-अवजारे आदींच्या खरेदीसाठी जमलेले मुंबईकर आणि आकर्षक फुलांना पाहण्यासाठी –अनुभवण्यासाठी आलेली लहान मुले, अशा वातावरणात मुंबई पुष्पोत्सवाचा रविवारी समारोप झाला. तब्बल दीड लाख मुंबईकरांनी या पुष्पोत्सवाला अर्थातच वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाला भेट दिली. […]Read More

राजकीय

यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तेवीस हजार कोटींची तरतूद

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यावर्षी म्हणजे सन २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वेसाठी २३,७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधताना दिली. रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पात विविध राज्यांसाठी केलेल्या तरतुदींसाठी आयोजित वार्ताहर परिषदेला वैष्णव यांनी दूर दृश्य पद्धतीने संबोधित केलं. राज्यात होणाऱ्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि […]Read More

पर्यावरण

हायड्रोपोनिक्स शेती – मातीशिवाय झाडे वाढवण्याचे विज्ञान

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):जागतिक तापमानवाढ, जमिनीचा ऱ्हास, आणि वाढती लोकसंख्या यामुळे शेतीचे पारंपरिक स्वरूप बदलत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर हायड्रोपोनिक्स ही मातीशिवाय शेती करण्याची आधुनिक आणि प्रभावी पद्धत लोकप्रिय होत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी जागेत आणि कमी पाण्यात दर्जेदार शेती करणे शक्य होते. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय पाण्यात झाडे […]Read More

महिला

मेंदूचे आरोग्य आणि ताणतणाव व्यवस्थापन – महिलांसाठी महत्त्वाच्या टिप्स

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांवर घरकाम, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याचा मोठा ताण असतो. या ताणतणावाचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि एकूण आरोग्यावर होतो. त्यामुळे महिलांनी मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तसेच ताणतणाव व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी टिप्स: ताणतणाव व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या सवयी: महिलांसाठी विशेष सूचना: […]Read More